मौलाना आझाद अल्पसंख्याक फाऊंडेशनच्या वतीने पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांचा सत्कार

जळगाव(प्रतिनिधी) गुणवत्तापुर्ण सेवेसाठी पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांना नुकतेच राष्ट्रपती पदाने सन्मानित करण्यात आले. यानिमित्ताने मौलाना आझाद अल्पसंख्याक फाऊंडेशनच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला.

 

पोलीस अधिक्षक डाँ. पंजाबराव उगले यांना १५ आँगस्ट २०१८ यावर्षी शासनाकडून गुणवत्तापुर्ण सेवेसाठी पोलीस पदक जाहीर करण्यात आले होते. राज्यपाल यांच्या हस्ते पदक प्रदान करण्याबाबतचा ‘अलंकरण समारंभ’ मंगळवार १८ रोजी महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय, कुलाबा मुंबई येथे आयोजीत कार्यक्रमात जळगाव पोलीस अधिक्षक डाँ. पंजाबराव उगले यांना सन्माननीय राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या हस्ते गुणवत्तापुर्ण सेवेसाठी पोलीस पदक प्रदान करण्यात आले.
या निमित्ताने मौलाना आझाद अल्पसंख्याक समाज विकास फाऊंडेशन, जळगांव या संस्थेच्या वतीने राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांचा सन्मान संस्थेचे अध्यक्ष फिरोज शेख यांचा हस्ते सन्मानपत्र व शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी अमित माळी, मनोज भालेराव,भारती काळे, निशा पवार, निवेदिता ताठे, राकेश कंडारे, आदी उपस्थित होते.

Protected Content