करवाढ नाही ; पारोळा पालिकेचा शिल्लकी अर्थसंकल्प बहुमताने मंजूर

 

पारोळा, प्रतिनिधी । सन २०२० – २१ साठी नगर पालिकेने आज आपला अर्थसंकल्प सभागृहात सादर केला. कुठलीही करवाढ न करता ४ लक्ष रुपये शिलकीचा हा अर्थसंकल्प चर्चेतुन बहुमताने मंजूर करण्यात आला. पालिकेने नागरिकांनावर कराचा वाढीव भोजा न टाकता. इतर दुर्लक्षित उत्पन्न शोधून उत्पन्न वाढविण्यावर भर देण्याची चर्चा यावेळी करण्यात आली.

सकाळी ११ वाजता नगराध्यक्ष करण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांची बैठक घेण्यात आली. त्यात अर्थसंकल्पाचे चंद्रकांत महाजन यांनी वाचन केले. त्यावर चर्चा करण्यात आली. पालिकेने यावर्षी ४३ कोटी ८३ लक्ष १७ हजार पाचशे रुपये चे उत्पन्न अपेक्षित ठेवले आहे. तर ४३ कोटी ७९ लक्ष सतरा हजार पाचशे रुपये खर्च होणार आहे. खर्च वजा जाऊन चार लक्ष रुपये हे शिल्लक राहणार आहेत. दरम्यान या चर्चेत नगरसेवक दिपक अनुष्ठान, पी. जी. पाटील, कैलास चौधरी, बापू महाजन, प्रकाश महाजन, मनीष पाटील, नितीन सोनार, नगरसेविका अंजली पाटील यांनी सहभाग घेतला. याप्रसंगी उपनागराध्यक मनीषा शिरोळे, नगरसेविका रेखाताई चौधरी, पल्लवी जगदाळे, वैशाली पाटील, वंदना बडगुजर आदी नगरसेविका उपस्थित होत्या.तर काही सदस्य हे गैरहजर होते.

उत्पन्न वाढीवर भर- मुख्याधिकारी विजयकुमार मुंडे
करवाढ न करता पालिकेने अर्थसंकल्प हा मांडला आहे. ज्या मालमत्ता या कराच्या कक्षात अद्याप आलेल्या नाहीत. त्यांना आधुनिक तंत्रज्ञान वापरून कर कक्षेत आणून उत्पन्न वाढ करण्यात येईल. तसेच जाहिरातींवर देखील कर लावून उत्पन्न वाढविण्याचे प्रयत्न करणे, होणारा खर्चात काटकसर करणे, कार्यात्मक अनुदान वाढीसाठी उत्पन्न वाढवून अनुदान वाढण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करणार असल्याचे मुख्याधिकारी विजयकुमार मुंडे यांनी सांगितले.

Protected Content