रावेर तहसिलदारांकडून अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध धडक कारवाई

f040cd03 b271 46c5 a3e8 a539c8a0207d

रावेर, प्रतिनिधी | येथील तहसिलदारांनी सुटीच्या दिवशी भोकर नदीपात्रात उतरून अवैध वाळू उपसा करणाऱ्या टॅक्टरवर धडाकेबाज कारवाई केली आहे. हे टॅक्टर जप्त करून तहसिल कार्यालयात जमा करण्यात आले आहेत.

 

या बाबत अधिक वृत्त असे की, भोकर नदी पात्रातून अवैध वाळू उपसा सुरु असल्याची माहिती आज (दि.८) येथील तहसिल प्रशासनाला मिळाली होती. त्यामुळे क्षणाचाही विलंब न करता तहसिलदार सौ. उषाराणी देवगुणे व निवासी नायब तहसिलदार संजय तायडे यांनी आपल्या टीमसोबत पातोंडीनजिक असलेल्या भोकर नदीत उतरून, सुमारे एक कि.मी. चालत जाऊन अवैध वाळू उपसा करणाऱ्या टॅक्टर-टॉलीवर (क्र. MH-19-E-1799 ) कारवाई करुन ती जप्त केली. यावेळी त्यांच्यसोबत मंडळ अधिकारी खानापूर प्रदीप आळे, तलाठी एनआर. चौधरी हे होते.

Protected Content