Home Cities मुक्ताईनगर अल फलाह उर्दू हायस्कूलमध्ये वार्षिक संमेलन उत्साहात

अल फलाह उर्दू हायस्कूलमध्ये वार्षिक संमेलन उत्साहात

0
111


al falahan

 

मुक्ताईनगर प्रतिनिधी । तालुक्यातील अल फलाह उर्दू हायस्कूलमध्ये वार्षिक संमेलन (दि.06) रोजी घेण्यात आले असून यानिमित्ताने विविध सांस्कृतीक कार्यक्रम घेण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारात कलागुण सादर करून उपस्थितांची मने जिकली. कार्यक्रमाचे अध्यक्षपद शाळेचे संस्थापक मोहम्मद हुसेन खान यांनी भूषविले. कार्यक्रमाचे उद्घाटन रावेर लोकसभेचे आमदार शिरिष चौधरी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून रवींद्र पाटील, डॉ.जगदीश पाटील व नगराध्यक्षा नजमा तडवी उपस्थितीत होते.

कार्यक्रमात उपस्थित शहरातील इतर मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करून त्यांचे प्रोत्साहन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक इक्बाल शाह, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केलेत. नाटक व इतर सांस्कृतिक कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन अब्दुल रहीम व अतहर शाह यांनी केले.


Protected Content

Play sound