सिंधीकॉलनीत घरासमोरून सायकलची चोरी; एकाला अटक

जळगाव प्रतिनिधी । सिंधीकॉलनी परिसरात राहणाऱ्या एकाच्या संरक्षित भिंत ओलांडून सायकल आणि सायकल सोबत हवा मारण्याचा पंप चोरून नेल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणातील एका संशयितास पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जितेंद्र श्रीचंद तलरेजा (वय-४०) रा. सिंधी कॉलनी टी.एम.नगर यांच्या घराच्या कंपाऊन्ड मध्ये लावलेली सायकल व सायकलीसाठी लागणार फुट पंप अज्ञात चोरट्यांनी १२ मे २०२० रोजी मध्यरात्री चोरून नेला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत एक संशयित आरोपी अविनाश रामेश्वर राठोड (वय-१९) रा. मेहरूण, सप्तश्रृंगी मंदीरासमोर जळगाव याला ताब्यात घेतले. त्याचे चोरी केल्याची कबुली दिली. इतर दोन अल्पवयीन मुले फरार आहे. एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.कॉ. हर्षवर्धन सपकाळे करीत आहे.

Protected Content