निमगव्हाण येथील युवकांची पोलीसांना मदत ; ‘त्यांना’ विशेष पोलीस अधिकाऱ्याचा दर्जा

 

चोपडा, प्रतिनिधी । कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चोपडा पोलीस प्रशासनास मनुष्यबळाची आवश्यकता असल्याने चोपडा उपविभागाचे सहाय्यक पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी निमगव्हाण येथील तिघांची विशेष पोलीस म्हणून निवड केली आहे.

उपविभागाचे सहाय्यक पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी अनिल शिवाजी बाविस्कर, मधुकर राजेंद्र खंबायत व प्रशांत सुकदेव बाविस्कर या युवकांची ‘विशेष पोलीस अधिकारी’ म्हणून निवड केली आहे.  २ मे पासून पुढील आदेश पावेतो तात्पुरत्या स्वरूपात त्यांची निवड करण्यात आली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ठिक ठिकाणी नाकाबंदी करून ये-जा करणाऱ्यांची तपासणी सुरू आहे. त्यानूसार चोपडा व अमळनेर तालुक्याची सीमा असलेल्या निमगव्हाण-सावखेडा तापी पुलाजवळ हे युवक व गावातील सामाजिक कार्यकर्ते पोलिसांना स्वयंस्फूर्तीने नाकाबंदीत वाहन तपासणी कामी व कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सहकार्य करीत आहेत. निमगव्हाण-सावखेडा तापी पुलाजवळ नाकेबंदी करण्यात आली आहे.तेथे काही पोलिसांची ड्युटी लावली आहे.मात्र, रखतखत्या उन्हात आणि संपूर्ण रात्रभर जागून वाहनांची तपासणी करताना पोलिसांची दमछाक होते.व त्यांना मनुष्यबळाची कमतरता जाणवते.म्हणून हे ३ युवक व ग्रामपंचायत सदस्य संभाजी पाटील व सामाजिक कार्यकर्ते अरूण पाटील हे देखील विना मोबदला सेवा देऊन निमगव्हाण-सावखेडा तापी पुलाजवळ नाकेबंदी ठिकाणी पोलीसांना सहकार्य करून कर्तव्य बजावत आहेत. फिजीकल डिस्टन्सिंग पाळुन प्रत्येकी एक तरूण ठराविक वेळेनंतर मदतीसाठी येतात. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप आराक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी किरण पाटील, किशोर शिंदे, महेश पाटील, किरण गाडीलोहार, अभिजीत पाटील, रविंद्र वाघ, सहकार अधिकारी डी.आर.पुरोहित, आरोग्यसेवक ईश्वर सैंदाणै, उज्वल घागरे, विनोद पवार, पी. बी. बोरसे, सुभाष शिरसाठ, शिक्षक गोपाळ बाविस्कर, दिलीप खैरनार, ज्ञानेश्वर बाविस्कर, होमगार्ड रोशन बाविस्कर, निलेश पाटील, तुषार धनगर, किरण शहा, पोलीस पाटील पवन भिल आदींना ते सहकार्य करीत आहेत.

Protected Content