चोपडा येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते ऑक्सीजन निर्मीती प्रकल्पाचे भूमीपूजून

चोपडा प्रतिनिधी । मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त २ कोटी रूपये खर्चा ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पाने भूमीपुजन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते आज करण्यात आले.

आमदार लताताई सोनवणे यांच्या प्रयत्नातीतून २ कोटी ४ लाख ५० हजार रूपयांचा निधी चोपडा उपजिल्हा रूग्णालयाला मिळाला. या निधीतून रूग्णालयासाठी ऑक्सीजन निर्मीती प्रकल्पाचे भूमीपूजन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.  

याप्रसंगी माजी आमदार व रावेर लोकसभा सहसंपर्क प्रमुख प्रा. चंद्रकांत सोनवणे,  शिवसेना उपजिल्हाप्रमुख कृउबा समिती सभापती तुषार उर्फ मुन्ना पाटील, चोपडा तालुका शिवसेना तालुकाप्रमुख राजू पाटील, यावल तालुकाप्रमुख रविंद्र सोनवणे, शिवसेना महिला आघाडीच्या जळगाव जिल्हाप्रमुख रोहिणी पाटील, महिला आघाडीप्रमुख मंगला पाटील, शिवसेनेचे शहरप्रमुख आबा देशमुख, शिवसेनेचे शहरप्रमुख नरेश महाजन, शिवसेनेचे तालुका संघटक सुकलाल भाऊ, शिवसेनेचे यावल आणि चोपडा विभागातील शिवसेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने या भुमीपुजन सोहळ्यास प्रामुख्याने उपस्थित होते.

 

Protected Content