भडगावसाठी पाणी आरक्षणास शासनाची मंजुरी ; आमदार पाटलांची वचनपुर्ती

kishor patil

पाचोर, प्रतिनिधी | भडगाव शहराला शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी गिरणा नदीवर पक्का बंधारा होण्यासाठी आमदार किशोर पाटील यांनी पाच वर्षांत शासनाकडे पाठपुरावा केल्याने गिरणा धरणातून पाणी आरक्षणास शासनाने मंजुरी दिली आहे.

भडगाव शहरासाठी गिरणा धरणातुन २.४६६ दलघमी एवढे पाणी आरक्षणाला शासनाने मंजुरी असून काल याबाबत अधिसुचना ही प्रकाशित करण्यात आली आहे. त्यामुळे गिरणा नदीवरील पक्का बंधाऱ्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी विद्यमान नगरध्यक्ष अतुल पाटील व नगरसेवकांनी ही सातत्याने आमदार किशोर पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला. भडगाव शहरवासीयाकडुन आमदार किशोर पाटील यांना धन्यवाद देण्यात आले आहेत.

Protected Content