पारोळा येथे भारिप बहुजन आघाडीतर्फे विविध मागण्यांसाठी रस्ता रोको

WhatsApp Image 2019 09 18 at 10.04.01 PM

पारोळा,प्रतिनिधी |शहरातून जाणारा महामार्गावर भारिप बहुजन आघाडीतर्फे येथे विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय महामार्गावर क्रमांक ६वर जवळपास अर्धा तास रास्ता रोको करून तहसीलदार वंजारी यांना निवेदन देण्यात आले.

शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफी करावी, वीज बिल माफ करावे, तालुक्याचा विकास साधण्यासाठी पारोळा हे स्वतंत्र विधानसभा क्षेत्र करण्यात यावे. रमाई व शबरी घरकुल योजनांचे उद्दिष्ट वाढवून मिळावे. घरकुलाची रक्कम ३ लाखांपर्यंत करावी, बिरसा मुंडा कृषी योजना व डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन कृषी योजनांचे वितरण ड्रॉ पद्धतीने करून त्यांचे लक्षांक वाढवून मिळावे. सर्व महामंडळांना तत्काळ निधी मिळावा या मागण्यांसाठी पारोळ्यात सुमारे अर्धा तास रस्ता रोको आंदोलन भारिप बहुजन आघाडी तर्फे करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे, उपजिल्हाध्यक्ष भगवान सोनवणे, जिल्हा महासचिव वैभव शिरतुरे, तालुकाध्यक्ष गौतम पवार, उपाध्यक्ष समाधान कोळी, तालुका महासचिव अकिल शेख, युवाध्यक्ष योगेश महाले, कार्याध्यक्ष देविदास पवार, शहर अध्यक्ष कमलेश सोनवणे, तालुका महिला अध्यक्ष माया सरदार, ज्येष्ठ कार्यकर्ते शांताराम जाधव यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

Protected Content