गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात सद्भावना दिवस साजरा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनाअंतर्गत नुकतेच सद्भावना दिनानिमित्‍त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पीपीटीद्वारे सद्भावना दिनामागील भूमिका स्पष्ट करण्यात आली.

देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची ७७ वी जयंती आहे. दरवर्षी हा दिवस दिवंगत राजीव गांधी यांच्या स्मरणार्थ सद्भावना दिवस साजरा केला जातो. त्यानिमित्‍त गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्यावतीने सद्भावना दिनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी दिवंगत राजीव गांधी यांच्या जीवनाविषयी माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. सर्वप्रथम त्यांच्या प्रतिमेस मार्ल्यापण करुन अभिवादन करण्यात आले.

वयाच्या ४० व्या वर्षी राजीव गांधी भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान झाले. ते १९८४ ते १९८९ पर्यंत देशाचे पंतप्रधान होते. भारतासाठी त्यांची दुरदृष्टी आणि समाजाच्या भल्यासाठी त्यांचे योगदान कधीही विसरता येणार नसल्याचे कार्यक्रमातून सांगण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी, महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद,स्वयंसेवक व विद्यार्थी उपस्थीत होते.

 

Protected Content