सुलोचना महानोर यांचे निधन

जळगाव प्रतिनिधी । मराठीतले सुप्रसिद्ध कवी पद्मश्री कविवर्य ना. धो. महानोर यांच्या पत्नी सौ सुलोचना महानोर यांचे वृद्धापकाळाने आज (दि.१० सप्टेंबर) रोजी दुपारी बारा वाजता दुःखद निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या. मृत्युसमयी त्यांचे वय 79 वर्षे होते.

शेती, साहित्य आणि रानात रमलेल्या कविवर्य महानोर यांच्या सहचारिणी म्हणून त्यांनी भक्कम साथ दिली. त्यांच्या पश्चात पती, 2 कन्या, 2 पुत्र, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.

सौ महानोर यांच्यावर जळगाव येथे इलाज सुरू होता. त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत नव्हती, अस्वस्थता ही वाढली होती. त्यांना जळगाव येथून त्यांच्या पळसखेडे येथील शेतात नेले व तिथे त्यांनी अंतिम श्वास घेतला.

 

 

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!