यावल येथे एकाने घेतले विषारी द्रव्य ; उपचारार्थ जळगावात

यावल प्रतिनिधी । येथील शिवाजीनगरातील एका तरुणाने शेतात विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. तरुणास तात्काळ उपचारासाठी जळगाव येथे पाठविण्यात आले आहे.

या संदर्भात मिळालेली माहीती अशी की, यावल शहरातील शिवाजीनगर या परिसरातील खालच्या वाड्यातील राहणारे दिलीप भगवान पाटील (वय४oवर्ष) शेतमजुर यांनी आज दि.१० सप्टेंबर रोजी सकाळी १o वाजेच्या सुमारास यांच्या शेतात संतापाच्या भरात काही तरी विषारी द्रव्यसेवन करुन आत्महत्याचा प्रयत्न केला. ही बाब कळताच दिलीप पाटील यांना युवकांच्या मदतीने तात्काळ यावलच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. बी. बारेला यांनी प्रथम औषद्य उपचार केले. मात्र रूग्णाची प्रकृती ही अधिक खालावल्याने दिलीप पाटील यांना पुढील उपचारासाठी तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या घटने संदर्भात यावल पोलीसात मात्र कुठलीही खबर नसल्याचे पोलीसांकडुन सांगण्यात आले आहे.

 

 

 

 

 

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!