रोटरी क्लब ऑफ चाळीसगावतर्फे विविध समाजोपयोगी उपक्रम

chalisgaon 1

चाळीसगाव प्रतिनिधी । शहरात महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्ताने रोटरी क्लब ऑफ चाळीसगावच्या वतीने परिसरात विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव समाजोपयोगी उपक्रमांतर्गत प्रामुख्याने बस स्थानक आणि रेल्वे स्टेशन येथे स्वच्छता अभियान राबवून त्याठिकाणी ओला कचरा तसेच सुका कचराचे नियोजन कसे करावे यासंदर्भात मार्गदर्शन संस्थेचे अध्यक्ष डॉ.संदीप देशमुख यांनी केले. महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून सामाजिक भान जपण्याचे व येणारी पिढी हेच भारताचे भवितव्य घडवू शकते व पुन्हा भारताला समृद्ध बनवू शकते. असे मनोगत डॉ.देशमुख यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले. याप्रंसगी युनिव्हर्सिटी बेस्ट – रोटरॅक्ट क्लब ऑफ जेएमसीईची स्थापना करण्यात आली.

यावेळी प्रामुख्याने रोटरी परिवारातील रोटे हरीश पल्लन, राजेंद्र कटारिया, बाळासाहेब सोनवणे, अनिल मालपुरे, गणेश बागड, सनी वर्मा, मधुकर कासार, सेक्रेटरी रोटे रोशन तातेड इत्यादी मान्यवरांनी श्रमदान केले. स्वच्छता कामगारांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात आले. यानंतर दुपारी जुलाल सिंग मंगतू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे “बदलत्या वयातील जाण व भान…” या विषयांतर्गत समाजसेविका दर्शना पवार यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. तसेच विद्यार्थ्यांना ‘जेंडर इक्वलिटी’ या विषयांतर्गत व्याख्यान देऊन समाज प्रबोधन करण्यात आले.

Protected Content