कजगाव येथील हिरण विद्यालयात गीतगायन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

f8ad58d9 800c 4533 8406 9a0d613ec200

चाळीसगाव, वृत्तसंस्था | लोकशाहिर आण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्ताने तालुक्यातील कजगाव येथील ब.ज. हिरण विद्यालयात आज (दि.१) गीत-गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत लावणी, पोवाडा, देशभक्तीपर गीते, कविता, भावगीते इत्यादी प्रकार विद्यार्थ्यांनी सादर केले. विद्यालयातील ३५ विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला.

 

यावेळी स्पर्धेत राजेश पाटीलयाने प्रथम क्रमांक पटकवला. त्यात ‘मी शेतकऱ्याचे लेकरु आता माझ्या डोळ्यात पाणी मुळीच येत नाही’. ही त्याचे वडील कवी
उज्वल पाटील यांची कविता त्याने सादर केली होती. दुसरा क्रमांक राजश्री पाटील व तिसरा क्रमांक तन्वी अहिरे यांनी पटकवला. विद्यालयाच्या वतीने सदर
विद्यार्थ्यांना प्राचार्य पी.बी. मोरे यांच्या हस्ते ग्रंथ भेट देण्यात आले. सदर स्पर्धेचे परिक्षण उपशिक्षिका एल.जे. सोनवणे व श्रीमती एस.एम. शिंदे यांनी केले. स्पर्धेत यश चावरे, लिना सुतार, राजश्री पाटील, मयुरी पाटील, जान्वी पाटील, तन्मय गायकवाड, भाग्यश्री महाजन, पायल महाजन, जागृती राजपुत, साई पवार, हर्षल महाजन, अफ्रीद खाटीक, देवेंद्र महाजन, शिवाणी पाटील ह्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ शिक्षक जी.टी. पाटील यांची निवड करण्यात आली. त्यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक के.ल. पाटील यांनी केले तर सुत्रसंचालन एस.पी. गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता एस.जे. सोमवंशी, एस.पी. देशमुख, के.सी. बारेला, पी.एस. पाटील, पी.एच. झालसे, रावसाहेब पाटील, भूषण रविंद्र देवरे, एम.के. पवार, प्रशांत बाविस्कर यांनी परिश्रम घेतले. यावेळी विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content