धरणगाव येथे अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

dharanagaon

धरणगाव प्रतिनिधी । सामाजिक समरसता मंच धरणगाव यांच्या वतीने आज दि. 1 ऑगस्ट रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.

याबाबत माहिती अशी की, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी तरुण भारतच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विशेषांक मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय समरसता गती विधी सदस्य प्रा.रमेश महाजन, राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य प्रा.दिलीप पाटिल, जिल्हा कार्यवाह किशोर चौधरी, तालुका संघचालक एम.एच.चौधरी, सामाजिक समरसता मंच जिल्हा संयोजक महेश अहेरराव, तालुका संयोजक संजय तोडे, तालुका कार्यवाह देवेंद्र अत्तरदे, धरणगाव नगर पालिका गटनेते कैलास माळी, नगरसेवक ललित येवले, चर्मकार समाजाचे राष्ट्रीय नेते भानुदास विसावे, मातंग समाजाचे तालुका अध्यक्ष रामा चित्ते, उपाध्यक्ष सोमा चित्ते, सुरेश चित्ते, सुनील चित्ते, प्रल्हाद जाधव, एकनाथ चित्ते, आदी समाजातील कार्यकर्त्ये व स्वयंसेवक उपस्थितीत होते.

Protected Content