आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नातून हातगाव तलाव प्रकल्पग्रस्तांना मोबदला प्राप्त

 

चाळीसगाव, प्रतिनिधी । तालुक्यातील हातगाव लघु पाटबंधारे तलाव क्र.२ च्या पाटचारीसाठी जमिनी गेलेल्या हातगांव, अंधारी, तमगव्हाण, माळशेवगे या गावांमधील शेतकऱ्यांचा प्रलंबित असलेला भूसंपादनाचा मोबदला नीधी नसल्याने रखडलेला होता. मात्र आ. मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याने शेतकऱ्यांना २ कोटी ४५ लाखांचा मोबदला शेतकऱ्यांना प्राप्त झाला  आहे.

चाळीसगाव तालुक्यातील हातगाव लघु पाटबंधारे तलाव क्र.२ च्या पाटचारी साठी जमिनी गेलेल्या हातगांव, अंधारी, तमगव्हाण, माळशेवगे या गावांमधील शेतकऱ्यांचा प्रलंबित असलेला भूसंपादनाचा मोबदला मिळण्यासाठी भूसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांनी भुसंपादन प्रस्ताव क्र.४७/२०१५ अन्वये अंतिम मोबदला रक्कम उपलब्ध करुन देणेबाबत रक्कम रु.२.४५,९६,१६८/- चा निधी मागणी प्रस्ताव लघु पाटबंधारे विभागाकडे पाठवला होता. मात्र शेतकऱ्यांनी वेळोवेळी पाठपुरावा करूनही त्यांना सदर मोबदला मिळत नव्हता. अशावेळी चाळीसगाव मतदार संघाचे आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे शेतकऱ्यांनी धाव घेतली. तेव्हा आमदारांनी ऑक्टोबर २०२० मध्ये तापी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी संचालक यांची भेट घेऊन शेतकऱ्यांची समस्या मांडली. तेव्हा निधी नसल्याचे सांगून पाठपुरावा सुरू असल्याचे सदर अधिकार्यांनी सांगितले होते. मात्र आ. मंगेश चव्हाण यांचा पाठपुरावा सुरू असल्याने अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. हातगाव तलाव – २ च्या भुसंपादन प्रस्ताव क्र.४७/२०१५ मधील शेतकऱ्यांचे प्रलंबित २ कोटी ४५ लक्ष ९६ हजार रुपयांचा धनादेश वितरीत करण्यात आला. दि.६ एप्रिल २०२१ रोजीचे कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग, जळगाव यांचे पत्र चाळीसगावचे उपविभागीय अधिकारी यांना प्राप्त झाले आहे. त्यानुसार सदर हातगांव ५२, अंधारी ४६, तमगव्हाण १३, माळशेवगे ३२ अश्या एकूण १४३ शेतकऱ्यांना हा मोबदला मिळणार आहे.

 

Protected Content