कोरपावली येथील जि.प.मराठी व उर्दू शाळा अतिक्रमणाच्या विळख्यात

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील कोरपावली येथील जिल्हा परिषदेची उर्दू व मराठी शाळेच्या जागेवर अतिक्रमण धारकांनी अतिक्रमण करून कब्जा केला आहे. याबबात शालेय व्यवस्थापन समितीने सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.

या संदर्भात तक्रार निवेदनात म्हटले आहे की, कोरपावली येथील जिल्हा परिषदच्या मराठी व उर्दु शाळेच्या मागील बाजुस बऱ्याच लोकांनी शाळेच्या जागेवर बेकाद्याशीररित्या अतिक्रमण करून त्या ठीकाणी पत्र्यांचे शेड व कुडाच्या झोपड्या बांधुन त्या ठिकाणी गुरे , ढोर, बैल बांधतात तसेच शाळेच्या भिंतीला लागुनच गुरा ढोरांचे शेण खत टाकलेले असुन, या प्रकारा मुळे शाळेच्या परिसरात दुर्गंधीचा त्रास होत असतो यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण झाला असुन , या बाबत वारंवार त्या अतिक्रमण धारकांना सांगुन व सुचना देवुन देखील ती मंडळी ऐकण्यास तयार नाहीत , उलट पक्षी आता या अतिक्रमण धारकांनी त्या ठिकाणी पक्के बांधकाम करण्यास सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे शाळा आवारातील वृक्षांना गावातील मंडळी ही आपली जनावरे बांधतात तसेच आपली ट्रॅक्टर व ट्रॉली आदी वाहने उभी करीत असतात , तरी विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या अतिक्रमण धारकांविरुद्ध आपण ग्रामपंचायतच्या माध्यमातुन योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी केली असुन , या संदर्भातील माहीती करीता तहसीलदार यावल ,गटविकास अधिकारी पंचायत समिती यावल यांना पत्र पाठविण्यात आले आहे . 

 

जिल्हा परिषद मराठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष  जुम्मा तडवी सचिव डी एस कोळी , जिल्हा परिषद उर्दु शाळा शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जावेद तडवी, सचिव अकील पटेल यांनी ही तक्रार केली आहे.

Protected Content