Home Cities जळगाव केसीईच्या प.वि.पाटील विद्यालयात महात्मा गांधी व शास्त्री जयंतीनिमित्त प्रतिमा पुजन

केसीईच्या प.वि.पाटील विद्यालयात महात्मा गांधी व शास्त्री जयंतीनिमित्त प्रतिमा पुजन

0
29


जळगाव प्रतिनिधी । केसीई सोसायटी संचलित गुरुवर्य प.वी पाटील विद्यालय एम जे कॉलेज जळगाव येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

सर्वप्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा पाटील यांनी महात्मा गांधी तसेच लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे माल्यार्पण करून पूजन केले. त्यानंतर सर्व वर्गातील विद्यार्थ्यांची ऑनलाइन वकृत्व स्पर्धा घेण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या घरातून सुंदरशा वेशभूषा करून महात्मा गांधी तसेच लाल बहादूर शास्त्री यांच्या कार्याचा उजाळा केला.

वक्तृत्व स्पर्धा त्यात इयत्ता २ रीमध्ये प्रथम क्रमांक पूजा सुतार, द्वितीय राज कोल्हे तर तृतीय केदार चव्हाण, इयत्ता ३ री मध्ये प्रथम वैष्णवी सोनवणे, द्वितीय सहज फेंगडे, तृतीय विश्वप कामळस्कर, उत्तेजनार्थ साई गोसावी तर इयत्ता ४ थी तील स्नेहल पाटील, रिया रायचंदे, अक्षरा सरोदे, येशांत वाघुळदे, देवराज झोपे. यांनी आपला सहभाग नोंदवला. विद्यार्थ्याना आपल्या मातृभूमी विषयी अभिमान व्हावा व त्यांनी तिच्या सेवेसाठी तत्पर असावे असे नितीमूल्ये यावेळी विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन सर्व शिक्षक कर्मचारी यांनी केले तर यावेळी पालकांचे मोठे सहकार्य लाभले.


Protected Content

Play sound