रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार थांबवा; विविध संघटनेचे महापौरांना निवेदन

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरात मोठ्या प्रमाणावर कोरोना रूग्ण आढळून येत आहे. बाधित रूग्णांसाठी लागणारे रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार होत आहे. हा काळाबाजार त्वरीत थांबवा अशी मागणी श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठान, जनमत प्रतिष्ठान आणि सर्वज्ञ बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने  महापौर जयश्री महाजन यांना  आज १९ एप्रिल रोजी निवेदनाद्वारे केली आहे. 

विविध संघटनांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रेमडेसीवीर इंजेक्शनचा पुरवठा शासनाने ताब्यात घेतल्यापासून रेमडेसीविर मिळवण्याकरता कोरोना रूग्णाच्या नातेवाईकांना रेमडेसीविर इंजेक्शन मिळत नाही, अगोदर जादा पैसे देऊन इंजेक्शन मिळत होते सध्या काही जण १५ ते २० हजार रुपयांना इंजेक्शन विक्री करीत आहेत. रेमडेसीवरचा तुटवडा आणि ऑक्सिजनची कमतरता या दोन्ही गोष्टींमुळे शहरातील डॉक्टर मंडळी आणि मेडिकल धारक हवालदिल तर झालेले आहेत, शिवाय सामान्य जनता आणि वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर मंडळी आणि मेडिकल धारक यांच्याबद्दल सर्व सामान्य जनतेच्या मनात दिवसेंदिवस असंतोष निर्माण होत आहे. भविष्यात एखादे हॉस्पिटल अथवा डॉक्टर किंवा कदाचित एखादा मेडिकल धारक या असंतोषाचा बळी पडू शकतो,  हा साराकाळा बाजार थांबवा असे परिपत्रक काढून डॉक्टरांना नोटीस काढवी आणि महानगर पालिकेने एक पथकाची नेमणूक करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

Protected Content