यावल तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढला

यावल प्रतिनिधी । कोरोनाचा तालुक्यातील ग्रामीण भागातील संसर्ग वाढला असून रूग्णांची संख्या दोनशेच्या उंबरठ्यावर जाऊन पोहचली असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की दिनांक ३० जून रोजी यावल तालुक्यात १९ कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. यामुळे आजवरच्या बाधीत रूग्णांची संख्या १८४ वर जाऊन पोहोचली आहे यात ग्रामीण भागात ९४ तर शहरी भागात नव्वद अशी १८३ कोरोना पॉझिटिव चाचणी अहवालातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. या रुग्णांपैकी ग्रामीण भागातील ४० तर शहरी भागातील ६० अशा शंभर लोकांना उपचारांती डिस्चार्ज करण्यात आले असून यावल तालुक्यातील ग्रामीण भागातील ४८ तर शहरी भागातील १८ अशा एकूण एकूण ६६ रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. तर एकूण १४ लोकांचा या आजारामुळे मृत्यू झालेला आहे. ग्रामीण भागातील शहरी भागातील नऊ रुग्णांचा यात समावेश आहे.

आज प्राप्त झालेल्या रुग्णांमध्ये एका यावल पंचायत समितीतील एका सदस्याचा समावेश असल्याचे निष्पन्न झाले असून यामुळे यावल पंचायत समिती चे कामकाज पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहे. परिणामी आरोग्याची खबरदारी म्हणून अनेक लोकप्रतिनिधींनी स्वतःहून आपल्या कुटुंबांना क्वॉरंटाईन करून घेतल्याची माहिती समोर आली आहे. ग्रामीण भागातली कोरोना पॉझिटिव रुग्णांची सातत्याने वाढणारी संख्या आरोग्य प्रशासनाला डोकेदुखी ठरू शकते. यामुळे प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले, तहसीलदार जितेंद्र कुवर, पोलीस निरीक्षक अरुण धनवडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ हेमंत बर्‍हाटे यांच्यासह यावल नगर परिषद व फैजपूर नगर परिषद प्रशासनाने नागरिकांना घरातच राहून प्रशासनाला सहकार्य करण्याची आवाहन केले आहे.

Protected Content