डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये कोविडच्या आरटीपीसीआर चाचणीला मान्यता

जळगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या आपत्तीत रूग्णांना तपासणीची सुविधा मिळावी म्हणून डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये कोविडच्या आरटीपीसीआर या प्रकारातील चाचणीला मान्यता देण्यात आली असून आज जिल्हाधिकार्‍यांनी याबाबतचे निर्देश जारी केले आहेत.

कोरोनाच्या आपत्तीमध्ये डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज व हॉस्पीटलमध्ये कोविड-१९ ने ग्रासलेल्या रूग्णांची सेवा करण्यात येत आहे. या हॉस्पीटललला डेडीकेटेड कोविड हॉस्पीटल म्हणून मान्यता देण्यात आली असून येथून हजारो रूग्ण कोरोनामुक्त झालेले आहेत. सध्या येथे कोविड आणि नॉन-कोविड या दोन्ही प्रकारातील रूग्णांवर उपचार केले जात आहेत.

दरम्यान, जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप काही अंशी कमी झाला असला तरी दुसर्‍या लाटेची शक्यता लक्षात घेऊन डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज व हॉस्पीटलमध्ये कोरोनाच्या चाचणी केंद्राला मंजुरी देण्यात आली आहे. हॉस्पीटलमध्ये यासाठी स्वतंत्र विभागात अतिशय सुसज्ज अशी प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. आता या ठिकाणी जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त स्वॅब तपासणी करू शकणार आहे. याबाबतचे निर्देश आज जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत राऊत यांनी जारी केले आहेत.

Protected Content