कृषी आयुक्त डॉ. प्रविण गेडाम पोहचले शेतकऱ्यांच्या बांधावर !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्याचे कृषी आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम यांच्यासह नाशिक विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी गुरुवार १ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता जळगाव जिल्ह्यातील सावखेडा, करंज आणि कानळदा भागातील शेतात पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडीअडचणी याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

राज्याचे कृषी आयुक्तालयाचे आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम आणि नाशिक विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी शुक्रवारी १  डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संवाद साधला. यामध्ये प्रवीण गेडाम आणि मोहन वाघ  यांच्यासह अधिकाऱ्यांनी सावखेडा खुर्द येथील शेतकरी विमलबाई सपकाळे, करंज गावातील शेतकरी धोंडीराम सपकाळे तर जळगाव तालुक्यातील कानळदा येथील आशाबाई राणे या शेतकऱ्यांची संवाद साधत कांदेबाग टिशू कल्चर, केळी उत्पादक आणि हार्वेस्टर मशीन संदर्भात माहिती जाणून घेतली. शिवाय प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य योजनेअंतर्गत केळी प्रक्रिया उद्योगास भेट दिली. यावेळी देखील त्यांनी उत्पादनाबाबत माहिती जाणून घेतली. दरम्यान आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी कृषी विभागाच्या योजनांचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देण्यात येईल असे आश्वासन दिले.

Protected Content