रस्त्यावर उभ्या एकाला दुचाकीची धडक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  शहरातील शिवकॉलनी येथे रस्त्यावर उभ्या प्रौढाला दुचाकीने धडक दिल्याने प्रौढ जखमी झाल्याची घटना सोमवार, २९ मे रोजी सकाळी पावणे अकरा वाजेच्या सुमारास घडली.याप्रकरणी दुचाकीस्वार तरुणीविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

जळगाव शहरातील शिवकॉलनीत मनोहर बाबुलाल चौधरी वय ५२ हे वास्तव्यास आहेत. ते सोमवारी सकाळी शिवकॉलनीत विजय पान सेंटरजवळ उभे होते, यादरम्यान या रस्त्यावरुन जात असलेल्या तरुणीच्या भरधाव स्कूटीने उभ्या असलेल्या मनोहर चौधरी यांना जोरदार धडक दिली. या धडकेत चौधरी यांच्या कमरेला तसेच उजव्या पायास मार लागला आहे. या परिसरातील नागरिकांनी चौधरी यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या अपघातप्रकरणी जखमी असलेल्या मनोहर चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन स्कूटीवरील तरुणीविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील पाटील हे करीत आहेत.

Protected Content