मन्यारखेडा येथील घरातून ६४ हजारांची रोकड लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील मन्यारखेडा येथे मध्यरात्री घरातून अज्ञात चोरट्यांनी लोखंडी कपाटातून ६४ हजार रूपयांची रोकड लांबविल्याची घटना समोर आली आहे. याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सविस्तर माहिती अशी की, रामदेव मकरजदुज कुशवा (वय-४३) रा. मन्यारखेडा ता. जि.जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मजूरी करून आपला उदरनिर्वाह करतात. ६ जुलै रोजी रात्री साडे अकरा वाजता कुटुंबियांसह रात्री झोपले. मध्यरात्री त्यांनी घराचा दरवाजा उघडा ठेवला होता. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घरात शिरून घरातील लोखंडी कपाटातून ६४ हजार रूपयांची रोकड लांबविली. हा प्रकार गुरूवार ७ जुलै रेाजी सकाळी उघडकीला आला. रामदेव कुशवा यांनी शनिवारी ९ जुलै रोजी नशिराबाद पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील ताास सहाय्यक फौजदार रविंद्र तायडे करीत आहे.

 

Protected Content