वाचन प्रेरणा दिनानिमित्त डॉ. आचार्य विद्यालयात वाचन हंडी उपक्रम

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  विवेकानंद प्रतिष्ठान संचलित डॉ. अविनाश आचार्य विद्यालय प्राथमिक विभागात वाचन प्रेरणा दिना निमित्त शाळेत वाचन हंडी चे आयोजन करण्यात आले होते.

 

डॉ. अविनाश आचार्य विद्यालय प्राथमिक विभागात वाचन प्रेरणा दिनानिमित्त सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन व वाचन हंडीचे उदघाटन शाळेच्या मुख्याध्यापिका योगीता शिंपी यांच्या हस्ते करण्यात आले. या वाचन हंडीत विविध लेखकांची पुस्तके ठेवण्यात आली होती.  हंडीतील एक चिठ्ठी काढून त्या पुस्तकाचे वाचन विद्यार्थ्यांनी केले. वांशिका अग्रवाल, सानवी कुलकर्णी, लोकेश चौधरी, अमृता वानखेडे या विद्यार्थ्यांनी वाचना विषयी मनोगत व्यक्त केले. केतन वाघ यांनी अब्दुल कलाम यांची माहिती सांगितली.  सूत्रसंचालन सीमा जोशी यांनी केले.

 

Protected Content