जिल्ह्यातील दोन उड्डाणपुलांचे उद्या नितीन गडकरी यांच्याहस्ते लोकार्पण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्ह्यातील दोन उड्डाणपुलांचे लोकार्पण केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांच्याहस्ते होणार असल्याचे माहिती खासदार उन्मेषदादा पाटील यांनी आज दिली आहे.

 

लोकसभा मतदारसंघातील अमळनेर तालुक्यातील अमळनेर चोपडा राज्य महामार्ग १५ वरील सुमारे पन्नास कोटी खर्चातून साकारलेला अमळनेर ते टाकरखेडे रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे फाटक क्रमांक १३६ येथील दोन पदरी उड्डाणपूलाच्या उद्या केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री ना.नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे.

 

याचबरोबर जळगाव शहरातील शिव कॉलनी येथील शिरसोली ते जळगाव रेल्वे स्थानकावर जळगाव शहरातून जाणार्‍या जुन्या राष्ट्रीय महामार्ग सहा बायपासवर २५ कोटी रुपयांच्या निधीतून दोन पदरी उड्डाणपुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन समारंभ देखील उद्या शिवाजीनगर पुणे येथे सकाळी दहा वाजता संपन्न होणार असल्याची खासदार उन्मेशदादा पाटील यांनी आज प्रसारमाध्यमांना दिली आहे.

 

महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने साकारलेले या दोन सेतुंचे लोकार्पण सोहळा उद्या सकाळी दहा वाजता संपन्न होणार असून खासदार उन्मेश दादा पाटील हे या सोहळ्यास उपस्थीत राहणार आहेत

Protected Content