युतीबद्दल बोलण्याचा अधिकार फक्त तीनच व्यक्तींना : गिरीश महाजन 

mahajan rawte

 

मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनेला १४४ जागा मिळाल्या नाही तर युती तुटू शकते, असे सूचक वक्तव्य शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी करून खळबळ उडवून दिली होती. यावर युती होणार आहे. युतीबद्दल बोलण्याचे अधिकार तीन व्यक्तीनांच आहे. त्यांच्याशिवाय कुणालाही अधिकार नाही, असे सांगत भाजपाचे नेते आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी रावते यांना टोला लगावला आहे.

 

शिवसेनेला १४४ जागा मिळाल्या नाही तर युती तुटू शकते, असे विधान शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले होते. यावर भाजपाचे नेते आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जागावाटपावरून युती तुटू शकते हा दावा फेटाळला आहे. महाजन म्हणाले, “युतीच्या जागावाटपाचा प्रश्न वरिष्ठ पातळीवरील आहे. त्याबद्दल बोलण्याचा अधिकार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या तीन व्यक्तीनांच अधिकार आहे.

Protected Content