धरणगावात छत्रपती शिवाजी महाराज व संत रविदास महाराज जयंती उत्साहात साजरी

धरणगाव (प्रतिनिधी) छत्रपती शिवराय व संत रविदास जयंती उत्सवानिमित्त धरणगाव शहरात उत्साहाचे व चैतन्याचे वातावरण पाहावयास मिळाले.बालाजी महाराज व महापुरुषांच्या प्रतिमेच्या पूजनाने रॅलीची सुरुवात मान्यवर व शिवजयंती उत्सव समिती धरणगावच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

 

बालाजी मंदिर , धरणी चौक , कोट बाजार , लांडगे गल्ली , परीहार चौक , शिवराय स्मारक , डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते पुन्हा छत्रपती शिवराय स्मारक असा रॅलीचा मार्ग होता.छत्रपती शिवराय व संत रविदास यांच्या प्रतिमेचे ट्रॅक्टर , बग्गीवर माँसाहेब जिजाऊ व बाल शिवराय यांचा सजीव देखावा , घोड्यावर शिवराय व त्यांच्यासोबत मावळे यांचा सजीव देखावा , महिलांचे पथक , महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचे झेंडा पथक , ढोल पथक , विविध महापुरुषांच्या सजीव देखाव्यांचे ट्रॅक्टर तसेच महात्मा फुले विद्यालयाच्या विद्यार्थिनी व शिक्षक , बँड पथक सोबत युवक व ज्येष्ठ नागरिक अशा पद्धतीने वैविध्यपूर्ण रॅली व शोभायात्रा धरणगावकरांनी अनुभवली.

रॅलीच्या मार्गात क्रांतिसूर्य महात्मा फुले, लालबहादूर शास्त्री , डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज या सर्व महापुरुषांच्या स्मारकांना माल्यार्पण करण्यात आले.परिसर दणाणून सोडणाऱ्या घोषणा , शिस्तबद्ध संचलन , महिलांची लक्षणीय उपस्थिती , शहीद जवानांच्या प्रति देशभक्तीपर गीतातून व्यक्त झालेल्या संवेदना , गावातील अनुभवी ज्येष्ठांचे मार्गदर्शन व युवकांचा उत्साह इत्यादी ठळक वैशिष्ट्ये रॅलीची सांगता येतील.महात्मा फुले विद्यालयाच्या वैशाली देशमुख , रत्ना महाजन , माहेश्वरी महाजन , दिव्या सपकाळे , सारिका गायकवाड , पूनम महाजन , रोशन कुंभार , अंकित महाजन , विकास महाजन , अजय माळी , यश महाजन , प्रशांत करंकाळ या विद्यार्थ्यांनी विविध महापुरुषांच्या वेशभूषा साकारल्या. त्यांच्यासोबत काही मुली व त्यांचे मार्गदर्शक शिक्षक प्रमोद पाटील सर , हेमंत माळी सर , व्ही. टी. माळी सर हेही उपस्थित होते.

बेलदार समाज अध्यक्ष व पंचमंडळ यांच्यावतीने रॅलीत पाणी वाटप करण्यात आले. अँग्लो उर्दू हायस्कूलचे विद्यार्थी व शिक्षक , जिल्हा परिषद उर्दू शाळा नं. ०१ व ०२ चे विद्यार्थी व शिक्षक देखील सहभागी होते. पी. आर. हायस्कूल , इंदिरा गांधी विद्यालय , गुड शेफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल , लिटल ब्लॉझम स्कूल व बालकवी ठोंबरे विद्यालय यांचे देखील शिक्षक वृंद सहभागी होते. शोभा यात्रेच्या मार्गावर गावातील विविध पतसंस्थांनी स्वागत गेट उभारले होते. संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेड धरणगाव यांचे देखील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.चर्मकार समाज महीला मंडळ , वाणी समाज महिला मंडळ चे देखील अनमोल सहकार्य लाभले.

 

या रॅलीत सहकार राज्यमंत्री गुलाबरावजी पाटील , जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गुलाबरावजी देवकर , काँग्रेसचे प्रदेश सचिव डी. जी. पाटील साहेब , चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे , प्रभारी नगराध्यक्ष वासुदेव चौधरी , शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबरावजी वाघ , माजी नगराध्यक्ष पी. एम. पाटील सर , गटनेते पप्पू भावे , गटनेते कैलास माळी सर , माळी समाजाचे उपाध्यक्ष योगराज माळी ,पाटील समाजाचे माजी अध्यक्ष सुकदेवआण्णा पाटील व विठ्ठलआबा पाटील , मराठे समाजाचे अध्यक्ष पांडुरंग मराठे (मोठा भाऊ) , जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते रघुआप्पा चौधरी , माजी उपनगराध्यक्ष दिपकभाऊ वाघमारे , राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष हेमंतभाऊ चौधरी ,सी. के. पाटील सर , शरदकुमार बन्सी सर , संजीवकुमार सोनवणे सर , नाईट ग्रुपचे अध्यक्ष चुडामण पाटील व उपाध्यक्ष समीर भाटीया , पुनिलाल महाजन , आर. डी. महाजन सर , राजेंद्र वाघ , किरण मराठे , बंटी पवार , दिपक जाधव , प्रकाश पाटील , डॉ.धनंजय पाटील ,बी. एन. चौधरी सर , भास्कर महाजन सर , डी. एस. पाटील सर , भगीरथ माळी , धर्मराज मोरे , कडू महाजन , चंदू भावसार , दीपक चौधरी , आबा महाजन , बंडू चौधरी , ह.भ.प. नाना महाराज त्याचप्रमाणे सर्व आजी माजी नगरसेवक , गावातील विविध समाजाचे अध्यक्ष व संचालक मंडळ ,पत्रकार संघाचे अध्यक्ष व सर्व पत्रकार बांधव , धरणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व सर्व पोलीस कर्मचारी , साईबाबा कामगार संघटना , विविध राजकीय , सामाजिक , व्यावसायिक , आध्यात्मिक , शैक्षणिक क्षेत्रातील जेष्ठ श्रेष्ठ मान्यवर तसेच नागरिक बंधू भगिनी उपस्थित होते.

कार्यक्रमाची शोभा वाढविण्यात विजय बँड अमळनेर , श्रीराम ढोल पथक पाळधी , सचिन भाऊ (बग्गी) पाळधी , विद्यार्थिनींचे झेंडा पथक , महिला व मुलींचे पथक , वाल्मीक पाटील (बाभळे) व आधारनाना चौधरी यांचे ट्रॅक्टर ,सलिम मामु (घोडे) , वास्तव डिजिटल धरणगाव , शिवशाही ग्राफिक्स , पांडुरंग महाराज फेटेवाले , युवराज महाजन (धानोरा) स्मारकांची सजावट व पुष्पहार , मोहन अण्णा (आचारी) , जितुभाऊ मित्र परिवार व जय हिंद व्यायामशाळा झेंडे बांधणे , किरणभाऊ झेंडे शिवणे यांनी मोलाची भूमिका बजावली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष जितेंद्र सुभाष पाटील तसेच दिलीप पाटील , चंदन पाटील , भिमराज पाटील , सुनीलबापू चौधरी (सूर्या बॅटरी) , गोपाल पाटील (पिंपळे) , किशोर पवार सर ,रवि पाटील , गोपाल पाटील, त्र्यंबक पाटील, राहुल मराठे (संभाजी ब्रिगेड) , एडव्होकेट संदीप पाटील , प्रा.रेवानंद पाटील , भैय्याभाऊ मराठे , परेश जाधव ,प्रा. रविंद्र मराठे , ईश्वर चौधरी , वाल्मीक पाटील (बंटी शेठ) , महेशभाऊ पाटील , विशाल पारेराव , हेमू चौधरी , आबा पाटील , गोकुळ पाटील , चेतन जाधव , रिंकू पाटील , समाधान पाटील , वैभव पाटील , ललित पाटील , नरेंद्र माळी (पप्पूभाऊ) , आनंद पाटील , आकाश माळी , भुषण पाटील ,नामदेव मराठे , भरत मराठे , भूषण मराठे , मोहीत पवार , सागर पाटील , विक्रम पाटील सर , अमोल सोनार सर , प्रा.आकाश बिवाल , सचिन पाटील (एस. पी.) ,शुभम पवार , विजय पंढरीनाथ महाजन , रावसाहेब पाटील (हनुमान नगर ) , राहुल फुलझाडे , गौरव पाटील ,जयेश बडगुजर , पप्पू पाटील , मनिष चौधरी , आयुष बागड ,प्रविण जोगी , आदी मंडळींनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाच्या शेवटी शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन लक्ष्मण पाटील सर यांनी केले.कार्यक्रमाचे आयोजन ‘शिवजयंती उत्सव समिती’ धरणगाव यांनी केले होते.

Add Comment

Protected Content