दारूसाठी कायपण… चाकूचा धाक दाखवत दारूच्या बाटल्या आणि रोकड लांबविली !

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । हॉटेल मॅनेजरला चाकूचा धाक दाखवून अश्लील शिवीगाळ करत जबरीने दारूच्या २ बाटल्या आणि बाराशे रुपयांची रोकड जबरीदस्तीने हिसकावून चोरून नेल्याची घटना शहरातील धुळे रोडवरील संजय बार अँड परमिट रूम येथे शुक्रवारी १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता घडली. या संदर्भात रविवारी १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, अमळनेर शहरातील धुळे रोडवर संजय बार अँड परमिट रूम नावाचे हॉटेल आहे. या ठिकाणी नंदू नारायण चौधरी (वय-४७) हे हॉटेल मॅनेजर म्हणून काम पाहतात. शुक्रवारी १६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता नंदू चौधरी हे हॉटेलवर असताना त्या ठिकाणी राजेश उर्फ दादू एकनाथ धोबी रा. जुना पारधीवाडा, अमळनेर हा त्या ठिकाणी आला. दरम्यान त्यांनी हातात धारदार चाकूचा धाक दाखवून नंदू चौधरी यांना अश्लील शिवीगाळ केली.

त्यानंतर त्यांच्याकडून जबरदस्तीने २ दारूच्या बाटल्या आणि बाराशे रुपयांची रोकड असा असा मुद्देमाल जबरदस्तीने हिसकावून चोरून नेला. तसेच “तू जर पोलिसात तक्रार दिली] तर तुझ्या परिवाराला मारून टाकीन” अशी धमकी दिली. दरम्यान ही घटना घडल्यानंतर रविवारी १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता हॉटेल मॅनेजर नंदू चौधरी यांनी अमळनेर पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार संशयीत आरोपी राजेश उर्फ दादू एकनाथ धोबी यांच्या विरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे हे करीत आहे.

Protected Content