दारूसाठी हॉटेल मॅनेजरला मारहाण; हॉटेल भाऊंचे येथील प्रकार

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील पाळधी शिवारातील हॉटेल भाऊंचे या ठिकाणी दारू विकत घेण्यावरून हॉटेल मॅनेजरला बेदम मारहाण करून करून गंभीर दुखापत करत हॉटेलच्या गल्ल्यातील ३० हजार रुपयांची रोकड काढून घेण्याची घटना शनिवारी १७ फेब्रुवारी रोजी रात्री ११.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी दुसऱ्या दिवशी रविवारी १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील पारधी शिवारातील रोडवर “हॉटेल भाऊंचे” या नावाचे हॉटेलमध्ये देविदास हेमराज ठाकूर वय-५० या ठिकाणी मॅनेजर म्हणून काम पाहतात. शनिवारी १७ फेब्रुवारी रोजी रात्री ११.३० वाजता संशयित आरोपी पद्माकर नन्नवरे, संजय नन्नवरे आणि त्यांच्यासोबत असलेले ५ ते ६ जण दारू पिण्यसाठी हॉटेलात आले. दरम्यान त्यांनी मॅनेजर ठाकरे यांना वाईन शॉपच्या रेटमध्ये दारू दे अशी मागणी केली. त्यावर मॅनेजरने दारू देण्यास मनाई केली. या रागातून पद्माकर नन्नवरे, संजय नन्नवरे आणि त्यांच्यासोबत असलेले ५ ते ६ जणांनी देविदास ठाकूर यांना बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. तसेच तू हॉटेलवर दिसला तर तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली. त्यानंतर ते बेशुद्ध झाले.

दरम्यान मारेकऱ्यांनी हॉटेलच्या गल्ल्यात असलेले ३० हजार रुपयांची रोकड काढून नेल्याचे समोर आले आहे. त्यानुसार दुसऱ्या दिवशी रविवारी १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता शुद्धीवर आल्यानंतर मॅनेजर देविदास हेमराज ठाकूर यांनी पोलीसात फिर्याद दिली. धरणगाव पोलीस ठाण्यात संशयित आरोपी पद्माकर ननवरे, संजय नन्नवरे आणि सोबत ५ ते ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन शिरसाठ हे करीत आहे.

Protected Content