अमळनेरात शिवजयंतीला नियोजनपध्द पोलीस बंदोबस्त

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील पोलीस स्थानकाच्या हद्दीत शिवजयंतीला कोणताही अनुचीत प्रकार होऊ नये म्हणून कडेकोट पोलीस बंदोबस्त राखण्यात आला होता.

अमळनेर पो.स्टे. हद्दीत काल दि.१९ फेब्रुवारी दिनानिमित्त श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त अमळनेर पो. स्टे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी पोलीस स्टेशनचे ४ दुय्यम अधिकारी व ६० अमलदार, स्थानिक गुन्हे शाखा जळगांव चे १० अमलदार, सायबर पोलीस स्टेशन चे १० अमलदार, आरसीपीचे १५ अमलदार, ४० होमगार्ड अशा प्रकारे नियोजन केले होते.

दरम्यान, पोलीस प्रशासनाने शहरात ओपन जीप गस्त सोबत दंगा नियंत्रण पथक; तहसीलदार मिलिंद वाघ, कार्यकारी दंडाधिकारी बावणे यांच्या सोबत घेऊन गस्त घातली. तसेच सर्व संवेदनशील भागात देखील गस्त पायी गस्तसाठी विशेष पथक नेमण्यात आले होते. ग्रामीण भागात देखील पाच मोटर सायकलस्वारांच्या मदतीने गस्त घालण्यात आली.

शिवजयंतीच्या दिनी पोलीस प्रशासनाने सोशल मीडियावर देखील लक्ष देऊन ज्यांनी आक्षेप असणारे स्टेटस, व्हिडिओ लावले होते अशाना समक्ष बोलून सक्त ताकीद दिली. पोलीस सोशल मीडियावर देखील लक्ष देऊन होते. यामुळे शहरासह तालुक्यात शिवजयंती महोत्सव शांततेत पार पडला.

Protected Content