बोदवडच्या मुख्याधिकारीपदी आकाश डोईफोडे

जळगाव प्रतिनिधी | जळगाव महापालिकेचे सहायक आयुक्त आकाश डोईफोडे यांची बोदवड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी म्हणून बदली झाली असून याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

राज्याच्या नगरविकास खात्याने जारी केलेल्या निर्देशानुसार जळगाव महापालिकेत सध्या सहायक आयुक्तपदी असणारे आकाश डोईफोडे यांची बोदवड येथे नियुक्ती करण्यात आलेली आहे. डोईफोडे आता बोदवड येथील नगरपंचायतीचे मुख्याधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. ते लवकरच आपला कार्यभार सांभाळण्याची शक्यता आहे.

बोदवड नगरपंचायतीच्या विकासकामांना आकाश डोईफोडे यांच्या नियुक्तीने वेग येण्याची शक्यता आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!