Home धर्म-समाज गटविकास अधिकारी यांच्या पत्राला ग्रामसेवककडून केराची टोपली 

गटविकास अधिकारी यांच्या पत्राला ग्रामसेवककडून केराची टोपली 

0
44

 

बोदवड – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील शिरसाळा येथील ग्रामपंचायत जनमाहिती तथा ग्रामसेवक यांच्याकडे दिनांक 05/07/2022 रोजी माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वय माहिती मिळवण्यासाठी अर्ज केला होता.

मौजे शिरसाळा ग्रामपंचायतीचे नमुना नंबर 16 चे पृष्ठ क्रमांक सह मिळण्यासाठी माहिती असता जनमाहिती अधिकारी तथा ग्रामसेवक शिरसाळा यांनी वेळेत माहिती न दिल्याने प्रथम अधिकारी तथा गट विकास अधिकारी पंचायत समिती बोदवड यांच्याकडे प्रथम अपील दिनांक 10/08/2022 रोजी प्रथम अपील दाखल केले.

त्यावर प्रथम आपली अधिकारी तथा गटविकास अधिकारी हेमंत काथेपुरी यांनी दिनांक 13/09/2022 रोजी वेळ 11:00 वाजता सुनावणी झाली.

पण मुजोर ग्रामसेवक 12:25 अपिलदालना न आल्यामुळे अर्जदार शेख निसार रशिद ( पत्रकार ) यांनी अपिलीय अधिकारी तथा गटविकास अधिकारी यांच्या कडे लेखी याबाबत तक्रार केली.

त्यावर गटविकास अधिकारी यांनी संबंधित ग्रामपंचायत यांनी दहा दिवसात अर्जदारास माहिती पुरावी असे लेखी पत्र दिले तरीसुद्धा जन माहिती अधिकारी तथा ग्रामसेवक यांनी आपली अधिकारी तथा गट विकास अधिकारी यांच्या पत्राला केराची टोपली दाखवल्याचे दिसत आहे.


Protected Content

Play sound