माजी सभापती दिपक पाटील यांनी आदिवासी बांधवांसोबत साजरी केली दिवाळी                                                

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्याती यावल पंचायत समितीचे माजी प्र. सभापती तथा गटनेते दिपक नामदेव पाटील यांनी आपल्या परिसरातील आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी करून सामाजिक बांधीलकीचा संदेश देत एक अभिनव असा मानवतेचा उपक्रम राबविला आहे.

२१ ऑक्टोबर रोजी दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजे वसुबारस च्या दिवशी शिरसाड शिवारातील भाडल्या तसेच शिरसाड-पिळोदा खुर्द पाड्यावर तसेच तसेच दि.२२ रोजी धनत्रयोदशीच्या दिवशी विरावली शिवारातील गोपाल पाड्यावर आदिवासी बांधव, महिला भगिनी व लहान मुलांसोबत दिवाळी साजरी केली. समाजसमूहात राहत असताना आपण समाजाचे काही देणे लागतो ही मानवतेची भावना दृष्टीसमोर ठेवत व इतरांसोबत दिवाळी साजरी करण्याचा आनंद द्विगुणित करता यावा म्हणून दिपक पाटील यांनी अशी आगळीवेळी दिवाळी साजरी करण्याचा संकल्प केलेला आहे. दिपक पाटील यांनी या आदिवासी बांधवांना फराळ व मिठाई देऊन दिवाळी उत्सव साजरा केला.

आदिवासी पाड्यावर जाऊन आदिवासी बांधवांसोबत लख्ख प्रकाशाचा दिपोत्सव साजरा केल्याने मला मनस्वी खुप आनंद झालेला असल्याचे बोलुन एक आत्मिक समाधान वाटत असल्याचे त्यांनी म्हटले. या निमित्ताने आदिवासी बांधवांशी संवाद साधताना त्यांच्या दैन्नदिन जिवनात येणाऱ्या समस्या आणी अडीअडचणी देखील त्यांनी जाणून घेतल्याची पाटील यांनी सांगीतले अ पाटील यांनी सांगितले.

याप्रसंगी त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी कल्पना पाटील, मुलगा शुभम पाटील, कल्पेश पाटील, प्रगतिशील शेतकरी बिस्मिल्ला खान हे हजर होते. पाटील यांच्या या अभिनव दिवाळीची साकळी- मनवेल परिसरात सर्वत्र खूप चर्चा होती.

Protected Content