तरूणीने उचलले टोकाचे पाऊल !

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा शहरातील श्रीराम चौकातील एका १८ वर्षीय तरुणीने आपल्या राहत्या घरात गळफास लावून जीवन यात्रा संपविल्याची दुर्दैवी घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटने प्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील जामनेर रोडवरील श्रीराम चौक येथे वास्तव्यास असलेल्या रोहीणी प्रविण मिस्तरी (वय – १८ वर्ष) हिने दि. २२ आॅक्टोबर रोजी सायंकाळी आई, वडिल बाजारात गेले असता घरात एकटीच असतांना घराच्या छताला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. सदरची प्रकार शेजाऱ्यांच्या लक्षात येताच एकच खळबळ उडाली. रोहीणी हिस तात्काळ पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत रोहिणी हिची प्राण ज्योत मालवली होती. घटने प्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून रोहिणी हिने आत्महत्या का केली ? या मागील कारण स्पष्ट होवु शकले नसुन पाचोरा पोलिस घटनेचा तपास करीत आहे. रोहिणी हिच्या अकस्मात मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे. रोहिणी हिचे पाश्चात्य आई, वडिल, एक भाऊ असा परिवार आहे.

Protected Content