सरपंचाला जीवेठार मारण्याची धमकी; बीडीओंना दिले निवेदन

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  यावल तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयाच्या परिसरात सरपंच यांना तीन गावगुंडानी दारूच्या नशेत वाद वाघुन धार्मिक तेढ निर्माण करीत जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. गावगुंडांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणीचे निवेदन सरपंच आणी महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदचे यावल तालुका उपाध्यक्ष सैय्यद असद सैय्यद जावेद अहमद यांनी एका निवेदनाद्वारे गटविकास अधिकारी डॉ मंजुश्री गायकवाड यांना दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, आपण सरपंच या नात्याने गावातील ग्रामपंचायतच्या प्रशासकीय कामा करीता ३ नोव्हेंबर रोजी यावल पंचायत समितीमध्ये आलो होतो.  पंचायत समितीच्या आवारात मद्यधुंद अवस्थेत उभे असलेले तीन अज्ञात  गावगुंडानी माझा हात पकडून दादागिरी व दमदाटी करून मला म्हणाले, अपमानास्पद व धार्मिक तेढ निर्माण होईल असे कृत्य करत हुज्जत घातली. ग्रामपंचायतीच्या आणी संघटनेच्या कामा करीता मला वेळोवेळी यावल पंचायत समितीच्या कार्यालयात यावे लागते तरी अशा प्रकारच्या दोन समाजात  जातीय तेढ निर्माण करून दंगल घडविण्याचा हा प्रयत्न आहे.  वेळीच अशा गावगुंड प्रवृत्तीस आळा घालण्यासाठी पंचायत समितीच्या आवारात सिसिटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे जेणे करुन भविष्यात होणारी दुर्घटना टाळता येईल असे म्हटले आहे. यावेळी गटविकास अधिकारी डॉ मंजुश्री गायकवाड यांना देण्यात आलेल्या निवेदना प्रसंगी मारूळचे सरपंच सैय्यद असद सैय्यद जावेद अहमद यांच्यासह पंचायत समितीचे माजी गटनेते शेखर पाटील , ग्रामरोजगार सेवक संघटनेचे पदाधिकारी व आदी ग्रामस्थ उपस्थित होते .

Protected Content