कोरोना : जिल्ह्यात दिवसभरात ३ संक्रमित रूग्ण आढळले; ३ रूग्ण झाले बरे !

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात तीन संक्रमित रूग्ण आढळून आले आहे. तर तीन रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

आज पाठविलेल्या कोरोना अहवाला जळगाव शहरातून एक तर भुसावळ तालुक्यातून दोन असे एकुण तीन कोरोना संक्रमित रूग्ण आढळून आले आहे. उर्वरित इतर तालुके निरंक आले आहे. तसेच जिल्ह्यातील १० तालुके पुर्णपणे कोरोनामुक्त झाले आहे. यात जळगाव ग्रामीण, पाचोरा, भडगाव, धरणगाव, यावल, एरंडोल, जामनेर, रावेर, पारोळा आणि बोदवड या तालुक्याचा समावेश आहे. जिल्ह्यात सध्या केवळ १९ रूग्ण अक्टीव्ह आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ४२ हजार ७११ बाधित रूग्ण आढळून आले होते. त्यापैकी १ लाख ४० हजार ११७ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे. 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!