गोव्यात सामूहिक संसर्गाला सुरुवात ; मुख्यमंत्र्यांची कबुली


पणजी (वृत्तसंस्था)
सध्या राज्यभरात विविध ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे गोव्यात कोरोनाच्या सामूहिक संसर्गाला सुरुवात झाल्याचे स्पष्ट होत आहे. आपल्याला ही बाब मान्य करावीच लागेल, असे वक्तव्य गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे.

 

 

गोव्यात कोरोना व्हायरसच्या सामूहिक संसर्गाला सुरुवात झाल्याची धक्कादायक कबुली गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे. शुक्रवारी प्रसारमाध्यमांना यासंदर्भात माहिती दिली. यावेळी त्यांनी म्हटले की, सध्या राज्यभरात विविध ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे गोव्यात कोरोनाच्या सामूहिक संसर्गाला सुरुवात झाल्याचे स्पष्ट होत आहे. शुक्रवारी गोव्यात कोरोनाचे ४४ नवे रुग्ण आढळून आले. गोव्यात आतापर्यंत १०३९ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यापैकी ६६७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर ३७० जण कोरोनातून बरे होऊन घरी परतले होते. तर दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Protected Content