चिंताजनक : देशातील कोरोनाबाधितांची संख्या पाच लाखांच्या पुढे !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशातील करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या २४ तासांत करोनाबाधित रुग्णांची संख्या १८ हजारांच्या पुढे गेली. त्यामुळे एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या पाच लाख ८ हजार ९५३ इतकी झाली आहे.

 

सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात सापडले असून दिल्लीचा दुसरा क्रमांक आहे. महाराष्ट्रात ९ मार्च रोजी कोरोनाचा पहिल्या रुग्णांची नोंद झाली होती, त्यानंतर शुक्रवारी दिवसभरात तब्बल ५ हजार २४ कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर १७५ मृत्यू झाले. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या १ लाख ५२ हजार ७६५ झाली असून बळींचा आकडा ७ हजार १०६ इतका झाला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५२.२५ टक्के झाले असून सध्या ६५ हजार ८२९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर राज्यातील मृत्यूदर ४.६५ टक्के इतका आहे. दरम्यान, उपचार घेत असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या आधिक आहे. एक लाख ९७ हजार ३८७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर दोन लाख ९५ हजार ८८१ जणांनी करोनावर मात केली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सुधारून ५७.४३ टक्के झाल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

Protected Content