उत्तर प्रदेशातील साधूंच्या हत्येला धार्मिक रंग देऊ नका ; उद्धव ठाकरेंचा टोला

मुंबई (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमध्ये दोन साधूंची हत्या झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्याप्रकारे आम्ही पालघर येथील साधूंच्या हत्येच्या घटनेमध्ये कठोर कायदेशीर कारवाई केली. त्याचप्रकारे तुम्ही सुद्धा कारवाई करून दोषींना कडक शिक्षा कराल अशी अपेक्षा आहे. अशा घटनांचे राजकारण करू नका. त्याला धार्मिक रंग देऊ नका, असा टोला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लगावला आहे.

 

 

उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमध्ये दोन साधूंची हत्या झाल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना फोन करून साधूंच्या हत्येवर चिंता व्यक्त केली आहे. तसेच एक ट्वीट देखील केले आहे. त्यात म्हटले आहे की, अशा अमानुष घटेनविरुद्ध आम्ही तुमच्यासोबत आहोत. ज्याप्रकारे आम्ही अशा प्रकारच्या घटनेमध्ये कठोर कायदेशीर कारवाई केली. त्याचप्रकारे तुम्ही सुद्धा कारवाई करून दोषींना कडक शिक्षा कराल अशी अपेक्षा आहे. अशा घटनांचे राजकारण करू नका. त्याला धार्मिक रंग देऊ नका. दरम्यान, पालघरमध्ये अफवेमुळे दोन साधूंची जमावाने हत्या केली होती. त्यानंतर पोलिसांनी शंभरहून अधिक लोकांना ८ तासांत ताब्यात घेतले होते. या घटनेवरून भाजपने राजकारण सुरू केले होते.

Protected Content