कोरोना : यावल शहरात नाकेबंदी

यावल, प्रतिनिधी । जिल्हयात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता रावेर-यावल उपविभागीय अधिकारी डॉ. अजीत थोरबोले यांच्या अध्यतेखाली येथील विभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे, तहसीलदार जितेंद्र कुंवर, पो. नि. अरूण धनवडे यांची आज सकाळी अकरा वाजता बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत रावेर-यावल तालुक्याच्या सर्व सीमेवर पोलीस चौक्या उभारून अत्यावश्यक अत्यंत आवश्यक असून यातून अत्यावश्यक सेवेचीच वाहने सोडण्या संदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्हयात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता प्रांताधिकारी डॉ.अजीत थोरबोले यांच्या अध्यतेखाली येथील पो. नि. अरूण धनवडे यांच्या दालनात मंगळवारी सकाळी बैठक पार पडली. तालुक्याच्या सीमेवर असलेल्या भुसावळ शहर सीमेवर, चोपडा तालुक्याच्या चिंचोली गावाजवळ तसेच जळगाव तालुक्याच्या कोळन्हावी सीमेवर पोलीस चौक्या उभाराव्यात व केवळ अत्यावश्यक सेवेची वाहनेच सोडावी असा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच परप्रांतातून येत असलेला शेतीमाल व केळी वाहतुकीसाठीची वाहनावरील मजुरांना सुरक्षितते विषयीच्या साधणांचा वापर करणे सक्तीचे करावे व फिजीकल अंतर ठेवण्या संदर्भातील तसेच वृध्द मजुरांची सुरक्षेविषयी सुचना देवून त्याचे कटाक्षाने आरोग्याची काळजी घ्यावी असे प्रांताधिकारी डॉ. थोरबोले यांनी बाजार समीतीचे सचिव स्वप्नील सोनवणे यांना दूरध्वनीवरून दिल्या आहेत. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुका हा यावलपासून अवघ्या १६ किलोमीटर अंतरावर असल्याने मागील २४ तासात भुसावळ शहरामध्ये विविध ठिकाणी कोरोना आजाराचे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्यामध्ये वाढ होत असल्याकारणाने शेजारच्या यावल तालुक्यात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. याकरिता तालुक्यातल्या महसूल व पोलीस प्रशासन सज्ज झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, प्रशासनाच्या आवाहनास कोरोनाच्या या वाढत्या प्रार्दुभाव टाळण्यासाठी सर्व नागरिकांनी एकजुटीने शासनाने दिलेल्या आदेशाचे काटेकोर पालन करावे तरच आपण कोरोना विरुद्ध चे युद्ध जिंकू असे प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांनी म्हटले आहे.

Protected Content