जिल्ह्यात बांधकामांना सशर्त परवानगी; कंटेन्मेंट झोनमधील बँका नागरिकांसाठी बंद

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात लॉकडाऊन शेवटच्या टप्प्यात आला असतांना जिल्हाधिकार्‍यांनी काही अटींच्या अधीन राहून बांधकामांना परवानगी दिली असून कंटेन्मेंट झोनमधील बँकांचे व्यवहार नागरिकांसाठी बंद करण्यात आले आहे.

राज्य सरकारने अलीकडेच जाहीर केलेल्या निर्देशानुसार बांधकांमांना सशर्त परवानगी मिळणार असल्याचे स्पष्ट झाले होते. या पार्श्‍वभूमिवर, आज सायंकाळी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी एका पत्रकाच्या माध्यमातून जिल्ह्यात बांधकामांना परवानगी देत असल्याचे जाहीर केले आहे. यानुसार, जुन्या इमारती पाडणे, इमारतींना वॉटरप्रूफींग करणे, डागडुजी करणे आदी कामांना मुभा देण्यात आलेली आहे. यासाठी कामागारांनी सोशल डिस्टन्सींगचे पालन करण्याची अट घालण्यात आली आहे. तर कामाच्या ठिकाणी हँडवॉश आणि सॅनिटायझर उपलब्ध करण्याचे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत.

दरम्यान, जिल्हाधिकार्‍यांनी दुसर्‍या आदेशपत्राच्या माध्यमातून कंटेन्मेंट झोनमधील बँकांचे व्यवहार हे नागरिकांसाठी बंद ठेवण्यात येतील असे जाहीर केले आहे. या पत्रानुसार कंटेंन्मेंट झोनमधील बँका या विहीत वेळेप्रमाणे सुरू राहतील. तथापि, यात खातेदार व्यवहार करू शकणार नाहीत. यामुळे बँकांचे कर्मचारी फक्त खातेनिहाय कामे करू शकतील. या बँकांच्या प्रशासनाने ग्राहकांना ऑनलाईन व्यवहारांच्या माध्यमातून सेवा पुरवावी. तसेच आवश्कता भासल्यास घरपोच पैसे देण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी असे निर्देश या पत्रात देण्यात आलेले आहेत. तर कंटेन्मेंट झोनमधील बँकांच्या कर्मचार्‍यांनी सोशल डिस्टीन्सींगचे पालन करून हँड वॉश व सॅनिटायझरचा उपयोग करण्याचेही सुचविण्यात आले आहे.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content