राज्य कोतवाल संघाचे तहसीलदारांना निवेदन

kotwal sangh nivedan

यावल प्रतिनिधी । येथील महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनाच्या यावल तालुका शाखेच्या वतीने तहसीलदार जितेन्द्र कुवर यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.

यावल येथील महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या वतीने विविध मागण्यांच्या देण्यात आलेल्य निवेदनात म्हटले आहे की, आमचे तलाठी सजेवर खाजगी व्यक्ती काम करीत आहेत. तालुक्यातील तलाठी सजा यावल, तलाठी सजा फैजपुर, तलाठी सजा न्हावी, तलाठी सजा हिंगोणा, तलाठी सजा बामणोद, तलाठी सजा भालोद, तलाठी सजा अंजाळे, तलाठी सजा विरोदा याशिवाय आमोदा, किनगाव, साकळी, आडगाव, कोरपावली, कोळवद, चुंचाळे या गावातील तलाठी सजांवर खाजगी व्यक्ति हे काम करीत आहे. संबंधीत खाजगी काम करणारे लोक हे गाव पातळी वरील कोतवालांना विश्‍वासात न घेता परस्पर काम करीत असतात. या खाजगी काम करणार्‍यांना सजेवर कायमचा प्रवेश बंद करण्यात यावा.

तालुक्यातील कोतवाल यांनी मागील लोकसभेच्या सार्वत्रीक निवडणुकीमध्ये व्हीपीएटी जनजागृतीसाठी काम केलेले आहेत, त्याचप्रमाणे निवडणुकीसाठी साहीत्य वाटपाचे काम आपल्या आदेशान्वये केली आहेत त्याचा मोबदला( मानधन) अद्याप मिळालेले नाही ते देखील तात्काळ मिळावे अशा मागणीचे निवेदन निवासी नायब तहसीलदार आर.के. पवार यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. हे निवेदन देतांना महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेचे तालुका अध्यक्ष ताराचंद मंगा तायडे, उपाध्यक्ष लिलाधर सोमा सपकाळे, कार्याध्यक्ष प्रल्हाद बळीराम बोरनारे, सचिव पंढरीनाथ किसन अडकमोल, सरचिटणीस सुरेश आर तायडे, जयश्री कोळी, शबाना तडवी, दिपाली बारी, सुमन हर्षल आंबेकर यांच्यासह अन्य कोतवाल उपस्थित होते. या निवेदनासोबत महाराष्ट्र शासनाच्या महसुल विभागाव्दारे १९ नोव्हेंबरच्या पत्राद्वारे कोतवालांच्या कर्तव्याबाबत उल्लेख करण्यात आलेला असुन त्या अनुसार संबधितांस कर्त्यव्ये पार पाडण्यासाठी कोणताही प्रतिबंध होणार नाही याची आपल्या स्तरावर नोंद घेण्यात यावी असे महसुलचे उपसचिव राजेन्द्र मारूती बेंगळे यांनी दिलेल्या महसुल व वन विभागाला देण्यात आलेल्या स्पष्ट उल्लेख करण्यात आले आहे.

Protected Content