सुरत ते बऱ्हाणपूर पायी प्रवास करणाऱ्या तरुणांना केळी वेफर्सचे वाटप

सावदा(प्रतिनिधी) करोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊन करण्यात आल्याने सर्व व्यवसाय बंद ठेवण्यात आले आहे. शहरातील काही मजूरांनी गावाकडे पायदळ निघाले आहे. सावदा येथे युनिक प्रभू बनाना चिप्स कंपनीतर्फे केळी वेफर्सचे वाटप करण्यात आले.

यावेळी युनिक प्रभू फूड प्रोडकटचे भूषण पाटील, हॉटेल न्यू सिमरनचे कुशल जावळे, राम होंडा शोरूमचे बंटी जंगले, पत्रकार प्रवीण पाटील, साईबाबा फूट वेअरचे बंडू जावळे, सचिन बऱ्हाटे, युवराज महाजन, सागर वंजारी, वसीम शेख, आदी उपस्थित होते. बऱ्हाणपूर जिल्ह्यातील बोरगाव येथील नरसिंह चारल, पीपल चारंग, दादू चारंग, लक्षण चारांग, देवराज चरांग आदी तरुण हे सावदा फैजपूर रस्त्यावर पायी चालत जात असताना वाहनांना हात देऊन थांबविण्याची विनंती करीत दिसले. त्यांची विचार पुस केली असता बऱ्हाणपूर येथील असून सुरतहुन गावाकडे जाण्यासाठी तीन दिवसांपूर्वी पायी निघाले असल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोना संदर्भात झाली प्रशासकीय बैठक
तहसिलदार यांनी शासनाने दिलेल्या अटी-शर्ती व शासकीय पासेस असणा-यांनाच पेट्रोल देण्याचे अवाहन त्यांनी केले. यानंतर कोरोना वायरस संदर्भात प्रशासकीय महत्वाची बैठक झाली. यामध्ये तहसिलदार यांनी खबरदारी घेण्याचे सूचना दिल्या आहे. या बैठकीत बीडीओ सोनिया नाकाडे, सीईओ रविंद्र लांडे, जोशी, वैद्यकीय अधिकारी डॉ.एन. डी. महाजन, शिवराज पाटील आदी प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

धान्य व्यापाऱ्यांची घेतली बैठक
यानंतर सर्वात शेवटी शहरातील प्रतिष्टित धान्य व्यापाऱ्‍यांना बोलावून कोरोना या महाभयंकर वायरसमुळे लोकडाउन असल्याने गरीब कुटुंबाना धान्य वाटप करता यावे यासाठी त्यांना सहकार्य करण्याचे अवाहन करण्यात आली.

Protected Content