आतेभाऊ-मामेभावाच्या भांडणात एकाचा खून; परिसरात खळबळ

यावल प्रतिनिधी | तालुक्यातील डांभुर्णी येथे आतेभाऊ आणि मामेभावातील किरकोळ वादातून झालेल्या भांडणात एकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील डांभूर्णी येथील आदीवाशी पावरा वस्तीतील रहिवासी तान्या लोटन बारेला (वय ५०वर्ष ) व त्याचा आतेभाऊ अखिलेश बळीराम बारेला ( वय ३६ वर्ष) यांच्यात घरगुती बोलचाल झाली असता त्याचे रुपांतर वादात झाले. यात संशयित आरोपी अखिलेश बळीराम बारेला (राहणार पिपल झपा मध्यप्रदेश) याने लाकडी दाडुक्याचा वापर करुन तान्या लोटन बारेला याला मारहाण केली. यात तो मृत झाला.ही घटना आज दि.९रोजी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास घडली.

या घटनेची माहीती पोलिस पाटील यांनी पोलिसांना कळवताच यावल पोलीस स्टेशनचे पोलिस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरिक्षक जितेंद्र खैरनार, सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे व त्यांचे सहकारी गणेश ढाकणे, सतीश भोई, विजय परदेशी आदी घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करुन तान्या बारेलाचा मृतदेह पोस्टमार्टम करण्यासाठी रूग्णालयात पाठवण्यात आला. पुढील तपास करतांना संशयीत आरोपी अखीलेश बारेला यास दारुच्या नशेत घरातुन पकडून यावल पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. तान्या बारेला हा रोजंदारी करुन आपला ऊदरनिर्वाह भागवत होता. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा१, मुली पाच व पाच जावई असा परीवार आहे.
डांभुर्णी गावात या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

तान्या बारेला याचे पार्थिव शव विच्छेदनासाठी यावलच्या ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले आहे. या संदर्भात उशीरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!