पष्टाणे येथे मध्यरात्री टेन्ट दुकानाला भीषण आग

धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील पष्टाणे बु॥ येथे मध्यरात्री आग लागून टेंट हाऊस दुकानातील साहित्य जळून खाक झाल्याची घटना घडली. यात शेतीचे अवजारे देखील जळून खाक झाले आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीसात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

तालुक्यातील पष्टाणे बुद्रुक येथे मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत टेंट हाऊसचा सर्व कापड, फायबर खुर्ची, गाडी, साहित्य पूर्ण जळाले तर ट्रॅक्टर व थ्रेशर यासह लाकडी शेती अवजार-पाईप, घराचे सागवाणी लाकूड जळून खाक झाले आहे. दुर्दवाने जिवीत हानी झाली नाही. सामाजिक कार्यकर्ते योगेश वाघ, अरविंद चौधरी, गोलू चौधरी आणि धरणगाव नगरपालिकेच्या अग्निशमन बंबाने ही आग विझाविली.

Protected Content