पहूर ग्रामीण रुग्णालयास आमदार महाजन यांची भेट

पहूर, ता.जामनेर प्रतिनिधी । पहूर ग्रामीण रुग्णालयास आमदार गिरीश महाजन यांनी आज भेट देऊन कोवीड परिस्थितीची पाहणी केली. रुग्णालयातील असुविधांबाबत खंत व्यक्त करत या सुविधा लवकरच उपलब्ध व्हाव्यात, यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागोजीराव चव्हाण यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला.

पहूरसह शेरी, लोंढरी, पिंपळगांव, हिवरी, सांगवी आदी ठिकाणचे रुग्ण मोठ्या संख्येने ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल होत आहेत .मात्र पुरेशा सुविधा उपलब्ध  नसतानाही वैद्यकीय यंत्रणा आपल्या जिवाची पर्वा न करता रुग्णांवर उपचार करीत आहेत .ग्रामीण रुग्णालयात रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा पुरेसा पुरवठा करावा , जनरेटर कार्यान्वित करावे ,  कोरोना प्रतिबंधक लसीचा पुरेसा पुरवठा करावा आदी सुविधांबाबत त्यांनी पाहणी केली यावेळी  पूण्याचे मुद्रांक जिल्हाधिकारी दिपक पाटील , माजी पं. स. सभापती बाबूराव घोंगडे , माजी जि.प. सदस्य राजधर पांढरे , जि. प. सदस्य अमित देशमुख , आरोग्य दूत अरविंद देशमुख ,  सरपंच पती शंकर जाधव , उपसरपंच राजू जाधव , सलीम शेख गणी ,  डॉ . जितेंद्र वानखेडे , डॉ .संदीप कुमावत , शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष शंकर भामेरे , मनोज जोशी , चेतन रोकडे ,  यांच्यासह वैद्यकिय पथक उपस्थित होते . यावेळी  लसीकरण केंद्रावर मंडप उभारण्याच्या सूचना त्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना केल्या .जनतेने सोशल डिस्टंसिंग पाळण्याचे सांगुन नियमित मास्क वापरावे असे  आवाहन त्यांनी यावेळी केले .

Protected Content