विद्यार्थी वाहतुकीचा जीवघेणा खेळ; पोलीसांचा कारवाईचा इशारा

रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या खासगी शालेय वाहनांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या जीवघेणी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येईल, अशा इशारा रावेर पोलीसांतर्फे देण्यात आला आहे. दरम्यान, रावेर पोलिसांनी शहरातील खासगी शाळांतील विद्यार्थ्यांना अॅपे रिक्षा, टाटा मॅजिक आणि ओम्नी या वाहनांमध्ये घेऊन जाणाऱ्या पाच वाहनांची स्टेशन डायरी नोंदवून त्यांना सोडले आहे.

रावेर शहराला लागुन अनेक खाजगी शाळा आहे.येथे शिक्षण घेण्यासाठी रावेर शहरासह खेड्यावरुन देखिल शाळेचे विद्यार्थी अॅपे रिक्शा, टाटा मॅजिक व ओमनी गाडी मधुन शिक्षण घेण्यासाठी येतात.परंतु या वाहनांमध्ये विद्यार्थी वाहतुकीचे अटीशर्तीचे सर्व नियम भंग करून ओव्हर विद्यार्थांची बसवुन वाहतूक केली जाते. या संदर्भात पोलिस हेड कॉस्टेबल भागवत धांडे यांनी रावेर शहरात ओव्हर शाळेचे विद्यार्थी भरलेल्या वाहनांना थांबवले असता टाटा मॅजिक गाडीत २० ते ५ मुले दाबुन भरली होती. तसेच इतर वाहनांमध्ये देखिल अशीच स्थिती होती. या सर्व वाहनांची स्टेशन डायरीला नोंद घेऊन समज देऊन सोडून देण्यात आले आहे. ओव्हर विद्यार्थांची वाहतूक न करता शासनाने घालुन दिलेल्या अटी शर्तीचा प्रमाणेच वाहतूक करण्याचे अवाहन पोलिस निरिक्षक कैलास नागरे सह पोलिस निरिक्षक शितलकुमार नाईक पोहेकॉ भागवत धांडे, मुकेश सोनवणे यांच्या तर्फे करण्यात आले आहे.

 

Protected Content