नगरपरिषेदच्या निवडणूकसाठी प्रसिध्द मतदार याद्यात मोठा घोळ; पुनर्निरीक्षणाची मागणी

पारोळा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | राज्य निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार पारोळा नगरपरिषदेच्या एकूण १२ प्रभागांच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.

दि. २१ जून रोजी या याद्या प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. दि. ३१ मे २०२२ रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदार संघाची यादी ग्राहय धरून प्रभागनिहाय विभाजीत करून प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत. परंतू याद्या प्रसिध्द करतांना १२ प्रभागाच्या भौगोलिक सिमा, रचना यांची जागेवरील परिस्थितीत व प्रत्यक्षात सर्वेक्षण करणे गरजेचे होते. या यादीमधील मयत मतदार स्थंलातरीत झालेले कुटुंब व प्रभाग बाहेरील मतदाराची संख्या प्रत्येक प्रभागात बहुतांश प्रमाणत येत आहे. तसेच बाहेरील प्रभागातील नवीन वाढीव मतदार ईतरत्र प्रभागातील याद्यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत.

या सर्व बाबी पाहता प्रसिध्द केलेल्या १२ प्रभागांच्या याद्यामध्ये मोठा घोळ असून याद्या किचकट क्लेशदायी अशा असल्या कारणांने सदर यादीचे पुनर्निरीक्षण होणे गरजेचे आहे. सदर याद्यांचे पुनःसर्वेक्षण करून यातून मयत, स्थलातरीत व प्रभागबाहेरील नावे वगळण्यात यावीत. अशी मागणी व हरकत मा. नगराध्यक्ष चंद्रकांत भिकनराव पाटील यांनी मुख्याधिकारी तथा प्रशासक निवडणूक विभाग नगरपरिषद पारोळा यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.

Protected Content