जुन्या वादातून मुलास बेदम मारहाण

चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | जुना भांडण उकरून एकाने १७ वर्षीय मुलाच्या डोक्यावर लोखंडी फायटरने जबर मारहाण केल्याची थरारक घटना शहरातील पाटील वाड्यात घडली आहे. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, “शहरातील पाटील वाडा येथील गफ्फार बागवान हे वरील ठिकाणी कुटुंबासह वास्तव्याला आहे. दरम्यान शनिवार, २५ जुन रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास कृष्णा बापू पाटील रा. पाटील वाडा ता. चाळीसगाव याने जुना वाद उकरून मुलगा अबरार गफ्फार बागवान (वय-१७) यांच्या खांद्या व डोक्यावर लोखंडी फायटरने बेदम मारहाण केली.

तेव्हा वडिलांसह परिसरातील नागरिकांनी मध्यस्थी करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. परंतु या वादात अबरार याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्याला लागलीच शहरातील खासगी दवाखाण्यात दाखल करण्यात आले. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांच्या जबाबावरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोना पंकज पाटील हे करीत आहे.

Protected Content